ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गाडेगाव येथील एका घरी सिलेंडरचा स्फोट

3.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुदैवाने जीवितहानी टळली

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथे आज सकाळी एका घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.पण एका गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सदर घटना आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 8:30 वाजता सुमारास घडली.

असून यामध्ये भारत झुकलुजी दाते यांचे घरासहित घरातील संपूर्ण वस्तू टीव्ही,फ्रिज,दिवाण,घरावरील टीना,कुलर व जीवन उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले आहे. भारत हे रोज मजुरी व मच्छीमारीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

त्यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळच्या सुमारास मार्डी येथुन सिलेंडर आणून घरात लावला सदर सिलेंडरचे कनेक्शन भारत यांच्या आईच्या नावाने आहे.सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी स्वयंपाक करण्यासाठी सिलेंडर सुरु करायला गेले असता सिलेंडर लिकेज असल्याने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांनी घराबाहेर निघून स्वतःसह कुटुंबाचा जीववाचवला या आगीमध्ये त्यांचे घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले व घरकुलचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून मिळालेले 15 हजार रोख व रोज मजुरीतून गोळा केलेले 35 हजार रुपये रोख एकूण 50 हजार रुपये नगदी सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाले आहे. व पूर्ण साहित्यसह भारत यांचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.

त्यामुळे एका मजुरावर घरातील जीवन उपयोगी पूर्ण साहित्य जळल्याने उपासमारीची वेळ आली आहे.सदर घटनेची माहिती तलाठी संजय शिंदे यांना मिळतात तलाठी लगेच घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्यांनी अहवाल तहसील कार्यालय मारेगाव येथे सादर केला आहे. भारत दाते यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर