ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक गोटमार संपन्न

2.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गोटमार बघायला उसळला अलोट जनसागर

यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असुन गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.हि यात्रा आज दिनांक 14 मार्च 2025 रोज शुक्रवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा आहे.राज्यासह लगतच्या राज्यातही ही यात्रा प्रसिद्ध आहे.गावाला लागूनच वाहणाऱ्या छोट्याश्या उगम पावणाऱ्या नाल्याच्या बाजूला श्री. संत गदाजी महाराज यांचे मंदिर आहे.धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

सकाळी कबड्डी खेळानंतर गावातून एका जीवंत व्यक्तीची अंत्ययात्रा (मढ मिरवणूक) काढली गेली.सकाळी 11 वाजता अंगावर शहारे आणणाऱ्या गोटमारिला सुरुवात झाली.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर गोटमार करत होते तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर गोटमार करीत होते.

जवळपास 1 ते 1:30 तास हा खेळ सुरू होता. जेव्हा भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.व गदाजी महाराजांच्या मंदिरातील रक्षा लावल्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे.

आज पासुन सुरु झालेली हि यात्रा तिन दिवस असुन दिनांक 18 मार्च 2025 रोज मंगळवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.आज पासुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन देवस्थान कमिटी तथा समस्त ग्रामवासी बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि.यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर