ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावच्या आठवडी बाजारात पोळ्याचा जल्लोष

606 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सर्जाराजाच्या साजाला महागाईची झळ

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : शेतकऱ्याच्या श्रमांचा सखा असलेल्या बैलाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा.अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगावच्या आठवडी बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. रंगीबेरंगी साज-सामानांनी बाजार खुलून दिसत असला तरी महागाईच्या झळेमुळे यंदा सर्जाराजाचा साज महागला आहे.

दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला होणाऱ्या बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत वेसन, पैंजण, झूल, बेगड, मोरके, कवडी, घंटा, आंबी हळद, पिंपळपान, सडे, चौरंग आदी साजसामानांची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभी राहिली. चौफेर रस्त्यांवर रंगीबेरंगी साहित्य पाहण्यासाठी व खरेदीसाठी शेतकऱ्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली.

शेतकरी वर्षभर आपल्या बैलाबरोबर राबतो. त्याच्या या जिवलग साथीदाराला सजविण्यासाठी शेतकऱ्यांची चढाओढ सुरू होती. बाजारात हिरव्या भाज्यांसह पोळ्यासाठी लागणारे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंमुळे बाजारपेठ फुलून गेली होती.

मात्र, महागाईच्या फटक्याने यंदा शेतकऱ्यांचा खिसा अधिकच पातळ झाला आहे. साजाच्या प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सजावटीचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीदेखील सणाच्या उत्साहात कोणतीही कमतरता नसून पोळ्याच्या सणाची चाहूल बाजारातून स्पष्टपणे जाणवत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर