ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास मनसे स्टाईलने आंदोलन

182 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील पत्रकार परिषदेत राजू उंबरकर यांनी केली घोषणा

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतकऱ्यांसमोर सध्या विविध समस्या आहे. त्या सुटण्याचे नाव घेत नाही. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्या प्रश्नाची साधी दखलही घेत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दिला.ते मारेगाव येथील विश्रामगृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मारेगाव तालुक्यात विजेचा मोठया प्रमाणावर लपंडाव सुरु आहे. शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी पेरणीही केलेली आहे.पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अशातच शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे.पण काहींचे विजेचे कनेक्शन कापलेले आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहे. काही ठिकाणी तार तुटलेले आहे. या व अशा अनेक समस्यांमुळे आणि वीज प्रवाह बंद असल्यामुळे शेतकरी ओलीत करू शकत नाही.

वनोजादेवी येथील प्रस्तावित नवीन उपकेंद्र अजूनही धुळखात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे तर पदाधिकारी मूग गिळून गप्प आहे. तालुक्यातील किती पांदन रस्त्याचे प्रस्ताव शासन दरबारी गेले हे कोणालाही माहिती नाही.तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे.चढया भावाने बियाण्यांची विक्री सुरु आहे. लिंकिंगच्या नावाखाली बोगस बियाणे देणे, खतसोबतही लिंकिंग असल्यामुळे शेतकऱ्यांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.

सरकार आणि नेते मंडळी डोळे लावून याकडे पाहत आहे. मनसे मात्र गप्प बसणार नसून जोडे मारो आंदोलन किंवा न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सर्वकाही करण्यात येईल असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला.यावेळी संतोष रोगे,रुपेश ढोके,धनंजय त्रिंबके,नबी शेख,उज्वला चंदनखेडे,उदय खीरटकर, किशोर मानकर, शुभम भोयर, जम्मू खान उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर