ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हिवरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काडण्यात आली.

सुरेश पाचभाई मारेगांव:- तालुक्यातील हिवरी येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त हिवरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 14 एप्रिल 2023 रोज शुक्रवारला डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

अनेकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भीम गीताचा कार्यक्रम झाला व संस्कृतिक कार्यक्रम झाले.भीमगीत अमोल पाझारे आणि विलास हनुमंते यांनी सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सरपंच सौ.इंदिराताई पिदुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील जेष्ठ नागरिक गजानन पा.भगत,ग्रा.उ.अजय राठोड,सदस्य युवराज पा. आस्वले,शाळा समिती अध्यक्ष ईश्वर पा.थेरे आणि विजय पा. पाझारे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भागवत यांनी केले.

तर आभार प्रदर्शन हंसराज झाडे यांनी केले.व त्यानंतर मिरवणुकीचे आयोजन श्रीकांत भगत व मित्र परिवार यांनी केले व मिरवणूक सनई डफर्याच्या गजरात काढण्यात आली.


ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर