ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

चंद्रभागा स्वच्छतेसाठी गुरुदेव भक्तांचे श्रमदान; ११ वर्षांची अखंड सेवा परंपरा कायम

413 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव आषाढी वारीनंतर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे चंद्रभागा नदी परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गीताचार्य तुकाराम दादा आणि संत गाडगेबाबा यांच्या अनुयायांनी पुन्हा एकदा श्रमदानाचा आदर्श घालून दिला आहे.

पंढरपूर येथील सांगोला मार्गावरील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर संस्था (गा.स.द.मं.) यांच्या वतीने सलग अकराव्या वर्षी चंद्रभागा स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, यंदाचे अभियान २७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो गुरुदेव भक्त स्वखर्चाने या अभियानात सहभागी होत आहेत.

हातात खराटे घेऊन चंद्रभागेच्या पात्रातील व परिसरातील कचरा साफ करत स्वच्छतेचा संदेश देत आहेत. विशेष म्हणजे या अभियानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरत आहे.
भू-वैकुंठ पंढरीत आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक दाखल होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होते.

मात्र, “प्रत्येक वारकऱ्याने स्वतःकडून कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही, असा संकल्प केला तर अस्वच्छतेच्या राक्षसाचा कायमचा नायनाट होऊ शकतो,” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा उपक्रम संस्थेचे संचालक श्री सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, सरपंच सौ. सुषमा ढोके, सुरज येवले, दिवाकर गाडगे, नामदेव येडे, कवडू वडस्कर, भूषण ढोबळे, गजानन घुमणर, स्वच्छता दूत कमलाजी कावळे, सुरेश चौधरी, सौ. अनिता ढेंगळे, सौ. सुमन आवारी, हरिभाऊ शिंदे, रुपेश ढोके, प्रा. सुरेंद्र नावडे यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्तांनी श्रमदान केले.
या अभियानासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री जनार्दन देठे व सचिव श्री दिलीप भोयर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

छायाचित्र ओळ : चंद्रभागा स्वच्छता अभियानांतर्गत हातात खराटे घेऊन चंद्रभागा नदी परिसरात श्रमदान करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गीताचार्य तुकाराम दादा व संत गाडगेबाबा यांचे अनुयायी.
छायाचित्र : प्रा. सुरेंद्र गोविंद नावडे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर