ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

तहसील परिसरात अस्वच्छता खर्रा  गुटख्याच्या पिचकारी ने रंगल्या भिंती

129 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पाण्या अभावी स्वच्छता गृहात दुर्गधी

पार्कींग व वाहन तळाला झुडपाचा वेढा

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तहसील कार्यालयात अनेक सोई सुविधा वाणवा असून आहे.उपलब्ध भौतिक सुविधा अतिशय दुरावस्था झालेली पाहायला मिळते.१५ ऑगष्ट १९९२ मध्ये झरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला त्या ठिकाणी एकात्मता बालविकासचे कार्यालय होते.

त्यानंतर २०१० नंतर  प्रशस्र इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर कार्यालयात सुरु झाले आहे.या कार्यालयात हजारो नागरिक  कामानिमित्त येतात.परंतु नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठेच दिसत नाही.इमारतीत खालच्या व वरच्या मजल्यावर प्रसाधन व सौच्यालाये आहे परंतु पाण्या अभावी दुर्गधी साचेली असून लोक मोकळ्या जागेचा वापर करतांना दिसतात.

शासकीय कार्यालयात खर्रा गुटखा खाण्यास बंदी असली तरी खिडक्या,पायऱ्या व भिंती पण तंबाखूच्या पिचकाऱ्या रंगलेल्या पाहायला मिळतात.वाहने उभी करण्यास स्वंतत्र जाग आहे मात्र त्या भोवती मोठमोठी झाडे व झुडपे वाढले आहेत.कार्यालयीन कर्मचारी यांचे सह कामासाठी येणारे लोक आपली वाहने मुख्य दारासमोर उभी करतात.त्याचा ये जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.त्या बाजूला असलेल्या रंगमंच असून त्याची दुरावस्था झाली आहे.

विद्यूत पुराठा खंडित झाला तर कामकाज अडू नये या साठी जनरेटरची व्यवस्था केली आहे .परंतु ते दोन तीन वर्षा पासून कायमचे बंद आहे.  विद्युत पुरवठा  खंडित झाला तर अनेक वेळा कामकाज होत नाही . कोतवाल बुक नक्कल ,हक्क नोंदणी,फेरफार रजिस्टर यासारखे कागदपत्रे कार्यालयात झेरॉक्स मारून देणे आवश्यक असते.मात्र येथील झेरॉक्स बंद असल्याने ही रजिस्टर बाहेरील झेरॉक्स मशीन वर नेवून काढून दिली जातात त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो आहे.मात्र याकडे तहसील प्रशासनाच कायमच दुर्लक्ष होत असून जनतेची मात्र गैरसोय होत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर