ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राष्ट्रीय लोकअदालत समिती पक्षकाराचे दारी

508 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

१६५ प्रकरणाचा निपटारा ५ लाख ५ हजार ११२ रक्कमेची वसुली

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

झरी जामणी:-महाराष्ट्र विधी सेवा प्राधीकरणाअंतर्गत राष्ट्रीय लोकअदालत चे दि.२८.०९.२४ रोजी आयोजन केले होते त्यावरून जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यवतमाळ अंतर्गत झरीजामणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती सदर लोक अदालतमध्ये न्यायालयातील दाखल वाद प्रकरणे व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कर प्रकरण,भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था, विज वितरण कंपनीचे वादपुर्वक खटले ठेवण्यात आले होते.

लोक अदालत मध्ये भाऊ बहीणीची शेतीचा वाद मिटविण्यात आले आहे यातील बहीण ही अपंग व लकवा मारलेली असल्याने ती अँटोत बसुन न्यायालयाचे आवारापर्यंत आली होती तीला चालता येत नसल्याने पँनल समिती स्वतः अँटोपर्यंत जावुन बहीण भावाचा वाद मिटविला आहे तसेच सदर लोकअदालतीमध्ये एकुण १६५ प्रकरणाचा निपटारा होवून एकुण रक्कम ५०५११२/- ची वसुली झाली आहे.

लोकअदालतीमध्ये पँनल प्रमुख म्हणून दीवानी न्यायाधीश एस.एस.काळे व पँनल सदस्य म्हणून अँड.व्ही.आर.मदीकुंटावार हे होते तसेच अँड.दिपक काटकर,ॲड .बोथले व न्यायालयीन कर्मचारी सहा.अधिक्षक शिरसाट व कर्मचारी  तिरपुडे,पौनीकर,दोहतरे, मुंडे, राळे,आडे, जुनघरे, प्रकाश बेरेवार यांनी काम पाहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर