ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट अडेगाव येथे कृष्णजन्मोत्सव साजरा.

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

छोट्या छोट्या राधा कृष्णाने वेधले गावकऱ्याचे लक्ष.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी प्रतिनिधी :- सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व उत्सवात अग्रेसर असलेल्या लोकप्रिय जिजाऊ ज्ञानमंदिर कॉन्व्हेंटमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक वाघू उरकुडे गुरुजी यांचा संस्थाध्यक्ष संदीप आसुटकार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघू गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.लताताई आत्राम (पंचायत समिती उपसभापती झरी), सेवानिवृत्त शिक्षक विवेक गावंडे आदींची उपस्थिती होती. श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमात शाळेतील स्पर्धक विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट राधा व कृष्ण स्पर्धेत बहुसंख्येने सहभाग नोंदवला होता.

जवळपास ५० विद्यार्थी सहभागी झाले. हंडी फोडण्याचा मान कान्हा म्हणून अनन्या डाहूले हिला मिळाला. अणण्याची वेशभूषा लक्षवेधक राहिली.उरकुडे गुरुजी, सौ.लताताई आत्राम,गावंडे सर यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पालकांच्या उदंड प्रतिसादामुळे राधा व कृष्ण या वेशभूषेला उदंड प्रतिसाद मिळाला होता.या साठी परीक्षक म्हणून उरकुडे गुरुजींनी यांनी काम पाहिले. गोपाळकाला आणि महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कृष्णजन्मोत्सव कार्यक्रमास चांगलीच रंगत आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक संदीप आसुटकार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष शिक्षिकासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असून सर्व स्तरातून शाळेचे कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर