ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती ची मुकुटबन येथे सभा सम्पन्न

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी (VJ,NT,SBC) च्या एल्गार मोर्चा संदर्भात घेण्यात आली सभा

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी: तालुक्यातील मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिरात काल रविवार दिनांक 31 डिसेंबर,2023 रोजी ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी,मारेगाव,झरी ची सभा सम्पन्न झाली. 11 फेब्रुवारी 2024 रोजी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी (VJ,NT,SBC) च्या एल्गार मोर्चा संदर्भात ही सदर बैठक घेण्यात आली.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा “ओबीसी” मध्ये समावेश करण्यात येऊ नये. तसेच ओबीसी(VJ,NT,SBC) ची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.या दोन प्रमुख मागण्यांसाठी वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी (VJ,NT,SBC) चा एल्गार मोर्चा दि.11 फेब्रुवारी 2024 ला काढण्याचे निश्चीत झाले आहे, तरी या मोर्चाच्या अनुषंगाने मुकुटबन येथे काल ही सभा घेण्यात आली.

झरी जामनी तालुक्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी योग्य नियोजन करून हा एल्गार मोर्चा यशस्वी करण्यासाठी यावेळी मा मोहन हरडे सरांनी समाज बांधवांना निर्देश दिले. यावेळी ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे समन्वयक प्रा,आशिष साबरे,नेताजी पारखी,

रफिक कनोजे, प्रा.अनिल टोंगे, सुरेश राजूरकर, विलास चित्तलवार सर, संजय चामाटे सर, तुळशीदास आवारी सर, गणेश बुट्टे सर, राजेश अक्केवार सर, पांडुरंग पंडिले साहेब, शशिकांत नक्षीने,अनिल कुंटावार सर,नारायनजी गोडे,संदीप विच्चू, निमंत्रक श्री मोहन हरडे सर इत्यादी समाज बांधव सभेला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा.आशिष साबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नेताजी पारखी सर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर