ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मारेगाव येथील बसस्थानकाची प्रतीक्षा संपली

839 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत कॉ.बंडू गोलर यांचे हस्ते उदघाट्न

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव,

मारेगावकरांना असलेली बस स्थानकाची प्रतीक्षा आता संपलेली असून नुकतेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत कॉ.बंडू गोलर यांचे हस्ते प्रतिक्षित बसस्थानकाचे उदघाट्न करण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वणी विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांचे मार्गदर्शनात जिल्हा सहसचिव कॉ.बंडु गोलर,तालुका सचिव कॉ.लता रामटेके,कॉ.रंजना टेकाम यांचे नेत्रुत्वात गेल्या दहा वर्षापासुन मारेगाव शहरात कायमस्वरूपी बसस्थानक व्हावे यासाठी मोर्चा,आमरण उपोषण,धरना,रास्ता रोको अशी सातत्याने आंदोलने करीत होते.

या प्रश्नाला सोडविण्यासाठी स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी विधानसभेत बसस्थानक मंजुर करवुन घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला.आणी आमदारांनी भाकपला दिलेला शब्द पुर्ण करून बसस्थानक मंजुर करवुन घेतले.आमदार बोदकुरवार यांनी मारेगाव येथे येऊन रीतसर निर्माणाधिन बसस्थानकाचे प्रणेते कॉ.बंडु गोलर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आणी अखेर भाकपच्या आंदोलनाला व आमदार बोदकुरवार यांचे प्रयत्नाला व संघर्षाला यश आले.मारेगाव तालुक्यातील बस  स्थानकाच्या प्रश्नाला घेऊन गेल्या 10 वर्षापासून लाल बावटा घेऊन रस्त्यावरील आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी आमदारांनी व प्रशासन तथा मारेगाव वासीयांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर