ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

झरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत

245 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

तालुक्यात वाघाची दहशत अनेक वर्षापासून कायम आहे.काल सायंकाळी साडेचार च्या सुमारास गवाऱ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेत शिवारात लक्ष्मीकांत गुरनुले यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला. सुदैवाने लक्ष्मीकांत व गाय बचावले. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत हे आपल्या गाईला शेताकडे चालण्यासाठी घेऊन गेले  होते.वाघाने गाईवर ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी लक्ष्मीकांत हे त्या गाईजवळच होते.त्यांनी आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले.

वाघाने लक्ष्मीकांत यांच्या दिशेनेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यांनीं पुऱ्या ताकती निशी आरडा ओरड करुन,वाघाच्या दिशेने दगड भिरकावल्याने वाघाने तिथून काढता पाय घेतला.यात गाय आणि मालक लक्ष्मीकांत वाचले असले तरी गाईवर पंजाचे आणि दातांचे निशाणी उमटले आहे. गाईच्या मालकाने घटनास्थळावरून गाईला गवारा पिवरडोल मार्गावर आणल्यानंतर गावातील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.या परिसरामध्ये सतत वाघाचे दर्शन लोकांना होत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सध्या शेतामध्ये कपाशीचे पीक पाच ते सहा फुट उंचीचे झालेले आहे त्यामुळे वाघ कुठेही दवा धरून बसू राहू शकतो.त्यामुळे नको ती घटना घडण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.अशाच वाघाच्या हल्ल्यात पिवरडोल येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.या घटनेमुळे या मार्गाने जाणाऱ्या लोकांतही भीतीचे वातावरण आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर