ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पांढरकवडा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्या

1.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राहत्या घरी घेतले विष

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील शेतकऱ्याने राहत्या घरीच विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.आशिष दिगंबर आस्वले 32 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पांढरकवडा येथील राहिवासी होता.

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा ( पिसगाव ) येथील आशिषकडे एक हेक्टर शेती आहे.तो या शेतीच्या उत्पन्नावर स्वतःच्या कुटुंबियांची उपजीविका करीत होता.परंतु अनियमित असलेला पाऊस आणि उत्पन्नामध्ये होत असलेला घाटा यामुळे मागील काही दिवसांपासून आशिष हा विमनस्क स्थितीत राहत होता.

अशातच दि. ५ ऑक्टोबरला दुपारी आशिषने आपल्या राहत्या घरी विषारी कीटकनाशक घेतले. विष घेतल्यानंतर त्याने ही माहिती शेतामध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांना कळविली. तसेच ही वार्ता गावामध्ये पसरली. गावातील नागरिकांना ही घटना माहिती होताच त्यांनी आशिषला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची तब्येत अस्वस्थ वाटू लागल्याने आशिषला वणी येथे रेफर केले. वणी जात असतांनाच आशिषचा वाटेतच मृत्यू झाला. त्याचेमागे आईवडील, पत्नी, एक भाऊ आणि बहीण असा आप्त परिवार आहे.
=======================
६ महिन्या वर्षांपूर्वीच झाला होता आशिषचा विवाह
आशिष आस्वले  याचा विवाह याच वर्षी ६ महिन्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मुलीशी झाला होता. अवघ्या ६ महिन्याच्या आतच आशिषच्या पत्नीच्या नशिबी वैधव्य आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर