ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

मुसळधार पावसाने दोघांची घरे कोसळली
दोघेही अल्पभूधारक शेतकरी

146 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घोडदरा येथील घटना

पाचभाई मारेगाव,सुरेश

काल झालेल्या मुसळधार पावसाने घोडदरा येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची घरे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.ही घटना दि.31 ऑगस्टला रात्री 10 च्या दरम्यान घडली.ऐन पावसाळ्यात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. सतत पावसाच्या रिपरिपने शेतकरी,शेतमजूर अडचणीत आलेले आहे. अशातच काल दि. 31 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली.या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले.तर घोडदरा येथील दोन घर पडल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यात घोडदरा येथील विवेक शंकरराव नरवाडे व नत्थू वामन गाथाडे या दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची घरे अतिपावसाने जमीनदोस्त झाली आहे. यात नरवाडे यांचे सुमारे 85 हजार तर गाथाडे यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असुन त्यांचे  कुटुंब उघड्यावर पडले आहे.प्रशासनाने तात्काळ आर्थिक सहायता करावी अशी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर