ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.दिनांक २३ जानेवारी २०२४ ते २५.२०२४ पर्यंत हे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होणार असून सदर स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्था मारेगावचे अध्यक्ष जीवन पा. कापसे, उदघाटक म्हणून नानाजी पा. खंडाळकर, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव

प्रमुख अतिथी नितीनभाऊ चंदनशिवे दंगलकार कवी कवठेमहाकाल,जिल्हा सातारा, वामनरावजी कासावर माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, चिंतामणराव कोंगरे वर्धा, सुधीर भाऊ दामले सचिव,शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, अँड. भास्कररावजी ढवस,सहसचिव, शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, नरेंद्र पाटील ठाकरे संचालक, शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, आशिषभाऊ कुलसंगे संचालक शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दिनांक २३जानेवारी २०२४ रोज मंगळवार सकाळी १० वाजता रांगोळी व पाककला स्पर्धा, सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा,सायंकाळी ४ते ६पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव यांच्याकडून करण्यात येणार आहे. तर दिनांक २४ जानेवारी २०२४रोज बुधवार सकाळी १० वाजता सिनेगीत व भावगीत स्पर्धा, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी तर दुपारी ११ वाजता सिने गीत व भावगीत स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय मारेगाव, दुपारी १२ वाजता अंताक्षरी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय,सायंकाळी ४ ते ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम वरिष्ठ महाविद्यालय,दिनांक २५ जानेवारी २०२४ रोज गुरुवारला दुपारी १२ वाजता सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते अभिजीत पंढरपूरे, आकाश कुमरे व संच.

दुपारी १ वाजता फॅशन शो सादरकर्ते वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे अध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, बक्षीस वितरक जनार्धन खंडेराव सहा पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मारेगाव,ज्ञानेश्वर सावंत पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन मारेगाव, प्रमुख अतिथी वाहेद अली संचालक शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव,महादेवराव पोल्हे संचालक शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, महेंद्र कुमार बोथरा संचालक शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, हे असणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून होणाऱ्या स्पर्धा आणि कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन


प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश घरडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव, प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी, कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव, सांस्कृतिक प्रमुख व महाविद्यालय प्रा.श्रीराम खाडे,प्रा. विजय भगत,प्रा.डॉ.जी एल सोनणार,प्रा. बाळासाहेब देशमुख, प्रा. स्नेहल भांदकक्कर,डॉ विमा घोडखांदे , प्रा.डॉ. संतोष गायकवाड,सांस्कृतिक प्रमुख कला वाणिज्य महाविद्यालय प्रा. कु. संगीता आवारी, प्रा. ए एच कुरेकर यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर