ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

हिवरी जी.प.शाळेला डिजिटल संच भेट
व्यवस्थापन समितीचा पुढाकार

655 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

  सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे दिनांक 5 ऑक्टोंबर 2024 ला जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिवरीला शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्मार्ट टीव्ही संच भेट देण्यात आला.यामुळे आता येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे.
      
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.ईश्वर थेरे ,सौ.शुभांगी पिंपळकर, सौ.लता मेश्राम, सौ.तृप्ती सोमलकर ,श्री.निलेश डवरे ,श्री.युवराज आस्वले,सौ.सुवर्णा कुळमेथे इ.सदस्यांनी तसेच हिवरी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.वसंत एकनाथ कुचनकार यांनी स्वर्गीय कैलास वसंतराव कुचनकार स्मृतीप्रित्यर्थ देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक स्वप्नील नवखरे यांनी, “हा टीव्ही विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याची संधी देईल,ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होईल.”असे मत व्यक्त केले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.ईश्वर थेरे यांनी, “आम्हाला ही कल्पना शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळेच मिळाली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवाला समृद्ध करणे,डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे,शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून शक्य होईल असे सूचित केले.

” या कार्यक्रमास हिवरी गावचे सरपंच,उपसरपंच व अन्य सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी खूप आनंद व्यक्त केला. त्यामुळे शाळेच्या वातावरणात उत्साह निर्माण झाला.शाळेचे सहा.शिक्षक अमोल वावरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच देणगीदारांचे व उपस्थितांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर