ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा दुष्काळ!

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भाजपचा इशारा – ‘आता आरपारची लढाई’

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा संतापजनक आरोप भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला आहे.

तालुकाध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार बोट ठेवले आहे. “राज्य महामार्गावर वसलेल्या मारेगाव तालुक्यात अपघातांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी तातडीच्या उपचारासाठी डॉक्टरच नसणे, ही केवळ निष्काळजीपणा नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी व दुर्गम असल्याने येथील गरीब जनतेला खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही. परिणामी, ग्रामीण रुग्णालय हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव आधारस्थान आहे. मात्र, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे ही आरोग्यसेवा अक्षरशः ठप्प झाली असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, काही दिवसांत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत “आता आरपारची लढाई लढू” असा इशाराच देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांमध्ये रोषाची लाट उसळली आहे. आता प्रशासन जागे होणार का, की आंदोलनाचा भडका उडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवेदनावेळी प्रशांत नांदे, सुरेश लांडे, प्रवीण बोथले, अनूप महाकुलकर, वैभव पवार, प्रसाद ढवस, गणेश खडसे, सुभाष खडसे, सुनील देऊळकर, अमोल कुमरे, पवन ढवस आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर