ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगांव येथे लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त शहरात रॅली काढण्यात आली

लाईनमन दिवसानिमित्त केला लाईनमनचा सत्कार

सुरेश पाचभाई मारेगांव,

महावितरण भारत सरकारचे आदेशान्वये सर्व सार्वजनिक व खाजगी विद्युत क्षेत्रातील सेवा असलेल्या लाईनमनच्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ हा दिवस लाईनमन दिवस म्हणुन मारेगांव येथील उपविभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

असुन राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्य महावितरण कर्मचाऱ्यातर्फे मारेगाव शहरात मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली असुन सदर रॅली सकाळी १० वाजता निघाली व शहरातून सुरक्षितते विषयी माहिती देत ११:३० वाजता महावितरण कार्यालयात परत आली.

तसेच विजेसारख्या अती महत्वाच्या क्षेत्रात जिवाची बाजी लावून अहोरात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवणार्या लाईनमन प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्च हा दिवस “लाईनमन दिवस” म्हणून पाळण्याचे शासनाने ठरविले आहे.त्या अनुषंगाने मारेगांव उपविभागातर्फे कर्मचाऱ्याचा सत्कार, समारंभ संपन्न झाला.

शहरकला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध खेळांचे आयोजन व सुरक्षा प्रतिज्ञा.दिली काल सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ सायंकाळी ७ वाजता पासुन या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.सदर कार्यक्रम हा 33/11 KV उपकेंद्र घोन्सा रोड मारेगांव (कान्हाळगांव) येथील कार्यालय परिसरातील साजरा करण्यात आला.

उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून हा कार्यक्रम साजरा केला.उपस्थितांनी मनोगत व्यक्त करतांना वीज ग्राहकास चांगल्यात चांगली सेवा देऊन भविष्यातील ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने पेलण्याचा संकल्प केल्या.लाईनमन हा महावितरणचा कणा आहे व तो उन वारा पावसाची पर्वा न करता जिवाची बाजी लावुन काम करत असतो असे मत व्यक्त केले असुन

या कार्यक्रमास कार्यक्रमांचे उद्घाटक मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेंद्रकुमार पाटील उपकार्यकारी अभियंता मारेगांव उपविभाग होते तसेच कीर्ती गजभिये सहाय्यक अभियंता मारेगांव उपविभाग, अतूल आत्राम सहाय्यक अभियंता मारेगांव(शहर),आशिष पवार कनिष्ठ अभियंता मारेगांव (ग्रामीण),

उमेश भोयर मुख्यतंत्रज्ञ उपविभाग मारेगांव, सपना खाडे वरीष्ठ तंत्रज्ञ,श्री.जोगदंड प्रधानतंत्रज्ञ, राकेश पाटील वरीष्ठ तंत्रज्ञ, शाम कुमरे,आशिष बदखल,चंपत टेकाम,अजय नान्हे,रोहीत गौरकार,विष्णु घोडके,प्रशांत वाढई, आनंद भगत,युवराज वरने,एल.बी.भगत, सुनिल तेलंग,प्रमोद पारेलवार,शैलेश जुमनाके,महादेव गव्हाने,अनिल परचाके,ग्रामीण विभाग एम.बी.कातकडे,

जी.पी.वैद्य,गजानन राठोड,उमेश कनाके,मेघा मडावी,प्रणाली ठाकरे,अंकुश माडेकर,गिरीश पाचभाई, के.एन. गजभे,जी.एम.बोबडे, सुरज गमे,यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ,सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सुत्र संचालन मेघा मडावी यांनी केले.तर आभार प्रफुल रासेकर यांनी मानले या वेळी सर्व कर्मचारी उपविभाग मारेगांव,हे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर