ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

काँग्रेसचे विविध समस्यांना घेऊन धरणे आंदोलन

430 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांचे नेतृत्वात धडकले काँग्रेसचे वादळ

सुरेश पाचभाई मारेगाव

वणी विधानसभा क्षेत्रात असलेल्या विविध समस्या,शेतकऱ्यांसमोर असलेल्या विविध अडचणी, तसेच वणी शहरातील प्रश्न  इत्यादी समस्यांना घेऊन मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरला वणी येथील तहसील कार्यासमोर काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय खाडे यांनी केले.या आंदोलनावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.तहसील कार्यालयासमोर असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला काँग्रेस पक्षाने विविध समस्यांना सामोरे ठेवत धरणे आंदोलन केले.

यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विविध समस्यांनी ग्रासलेल्या वणी  विधानसभा क्षेत्रातील समस्या उजागर करीत आपले मन मोकळे केले. त्यानंतर वणी उपविभागीय कार्यालयामध्ये जाऊन उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी कार्यालयासमोर आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले.यात सोयाबीनला 9 हजार रुपये व कापसासाठी 10  हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्यात यावा,शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा 12 तास वीजपुरवठा करण्यात यावा, निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करण्यात यावे,

वन्य प्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे प्रलंबित दावे त्वरित मंजूर करण्यात यावे, पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, उकणी येथील गावची उर्वरित दहा टक्के जमीन तात्काळ संपादित करून गावाचे शक्य तितक्या लवकर  पुनर्वसन करण्यात यावे,

कोळसा खाणीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे जो कोळसा खाली पडून त्याचे रूपांतर डस्ट मध्ये होते ते डस्ट पूर्णपणे शेतकऱ्यांच्या शेतमालावर बसून 70 टक्के उत्पादनात घट होत आहे.त्यामुळे कोल्हेरा,पिंपरी, निळापूर,ब्राह्मणी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई वेकोलीने द्यावी.

जुनाडा पुलाचे बांधकाम पूर्णत्वास असून चार वर्षे लोटले तरीही या पुलाला अप्रोच रोड तयार करण्यात आलेला नाही.त्यामुळे वणी वरून भद्रावतीला जाण्यास 45 किमी अंतर पडते. तेच जुनाडा पुलावरून वाहतूक चालू झाल्यास अंतर वीस किमी पडते.

वणी उपविभागामध्ये प्रचंड वाळू तुटवडा आहे.त्यामुळे सामान्य जनतेला व घरकुलधारकांना वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक लोकांची घरकुलाची कामे बंद आहे.वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित देण्यात यावा व बंद पडलेले ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ सुरू करून डॉक्टर व कर्मचारी भरती करण्यात यावी.

वणी शहरात व ग्रामीण भागात वारंवार होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा.शेतकऱ्यांना शेती उपयोगि बियाणे,खते, औषध यांचे वाढलेले दर कमी करून त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात यावा,या तशाच इतर अनेक मागण्यांना घेऊन काँग्रेसचे वादळ हे उपविभागीय कार्यालयामध्ये धडकलेलं होत.

“मतदानातूनच उत्तर द्या – संजय खाडे”

वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या समस्यांवर वारंवार निवेदन देण्यात आले.मात्र निगरगट्ट प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे कायम दुर्लक्ष केले.लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनतेनी मतदानातूनच चोख उत्तर द्यावे.
– संजय खाडे

यावेळी आंदोलनात मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर,जयसिंग गोहकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निखुरे,  अशोक पांडे, अशोक चिकटे, पवन एकरे, साधना गोहोकर, अल्का महाकुलकर,  संगीता खाडे, अनिल भोयर, उत्तम गेडाम, वंदना दगडी, अजय धोबे, काजल शेख, अनंता डंभारे, संदीप ढेंगळे, रुद्रा कुचणकर,प्रशांत गोहोकार, अरविंद वसनोर, प्रफुल थेरे, सागर बोबडे, अमोल झाडे,

प्रमोद लोणारे, गजानन शळके, रोहन आसुटकर, नरेंद्र लोणगाडगे, सचिन आसुटकर, प्रदीप खेकारे, अशोक नागभिडकर, कविता चटकी, रवी कोटावर, प्रफुल उपरे, रघुवेंद्र कुचनकर, सुरेश रायपुरे, सुरेश बनसोडे, कैलास पचारे, अरुण नागपुरे, नारायण गोडे, राजू मालेकर, समाधान कुंघटकर, संजय सपाट, मनोज खाडे, बंडू खिरटकर, मुरलीधर ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी व नागरिक शेकडो संख्येमध्ये उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर