ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कोलगाव येथील 28 वर्षीय युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

घरासमोरील जनावराच्या गोठ्यात कीटकनाशक प्राशन करून एका युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोलगाव येथे घडली.

विशाल अरविंद अवताडे अंदाजे वय 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील राहिवासी होता.

विशाल यांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.त्याने काल दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोज मंगळवारला सायंकाळच्या सुमारास घरासमोरील जनावराच्या गोठ्यात विषारी कीटकनाशक प्राशन केले.कुटुंबियांनाही ही बाब 8 वाजताच्या दरम्यान लक्षात आली.

कुटुंबातील सदस्यांनी त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात आले.

पण उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.मृतक विशाल यांचे पश्चात आई,वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. विशाल या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर