ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी : वणी

वणी तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेत शाळेचे विद्यार्थी व गावकऱ्यांच्या सहभागातून भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्रीच्या सत्रात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील युवक-युवती, महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी सादर केलेली विविध नृत्ये, गीतगायन, नकला व नाटिकांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

डोंगरगावच्या युवकांनी या कार्यक्रमानिमित्त स्वखर्चातून संपूर्ण गावासाठी शाळेच्या आवारात भोजनाची व्यवस्था केली होती. या भोजन व्यवस्थेसाठी बापूजी लोणगाडगे व त्यांच्या संपूर्ण संचाने मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन विरकुंड गट ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षाताई मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज जांभुळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सतीश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन विधाते, गावचे पोलीस पाटील पंढरी येटी, ग्रामपंचायत सदस्य अमोल पारखी उपस्थित होते.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शुभांगी मडावी, मंगेश बोबडे, प्रतिभा येटी, भीमराव टेकाम, राहुल मिलमिले, मनीषा येटी, रंजना आत्राम, अंगणवाडी सेविका नम्रता आमडे व साक्षी चोपणे यांनीही उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रमोद ढेंगळे यांनी केले तर प्रास्ताविक शिक्षक गोविंद कदम यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकरी मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर