ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

काँग्रेस जिवंत राहावी यासाठीच माझी उमेदवारी

158 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संजय खाडे यांचे अपक्ष उमेदवारीने महाविकास आघाडीत बिघाडी

माजी आमदार विश्वास नांदेकर आणि नरेंद्र ठाकरे घेणार विजयासाठी पुढाकार

तालुका प्रतिनिधी वणी

काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे यासाठीच माझी उमेदवारी आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रेम आणि आग्रहाखातर मी माझी उमेदवारी दाखल केली आहे.काँग्रेसचा परंपरागत असलेला गड हा ढासू न देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

जनतेचे प्रेम आणि सहकार्य यांच्या भरोशावरच मी या मतदार संघातून विजयाची शिट्टी फुकणार असल्याचेही संजय खाडे यांनी वणी येथील वसंत जिनिंगमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल जाहीर केले.यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी जी. प. उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे,मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा,सुनील वरारकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहकार,तेजराज बोढे,शंकर वऱ्हाटे,चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे, यादवराव काळे, तुळशीराम कुमरे उपस्थित होते.

संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत रंगत जरी आणली असली तरी त्यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी झालेली आहे.
संजय खाडे म्हणाले की मागील २६ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहो.मागील काही वर्षांपासून वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे पिंजून काढली. जनहित केंद्राच्या माध्यमातून जनतेची कामे केली. सर्वसामान्य कुटुंब, शेतकरी, महिला, बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या, शिक्षण विषयक समस्या सर्वतोपरी सोडवण्याला मी प्राधान्य देणार आहो.

वणी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटण्यासाठी जोरकस प्रयत्न केले.तिकिटाच्या रेसमध्ये मी सर्वात वर होतो.परंतु हा मतदारसंघ उबाठा या पक्षाकडे गेला आणि आमची काँग्रेस मित्र मंडळ नाराज झाली.परिसरातून वणी मतदारसंघातून काँग्रेस पक्ष नष्ट होऊ नये,काँग्रेस पक्षाचे चिन्ह जरी गायब झाले तरी काँग्रेस पक्ष हा रसातळाला जाऊ नये, म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या आणि मित्रमंडळींच्या तसेच मित्र पक्षाच्या आग्रहाखातर, सर्वांच्या प्रेमाखातर माझी उमेदवारी दाखल केलेली आहे.आणि या मतदारसंघातून मी शिटी जोरदार फुंकणार आहे,, असा निर्धारही संजय खाडे यांनी केला. माजी आमदार विश्वास नांदेकर आणि नरेंद्र ठाकरे यांनीही केले विजयाचे आवाहन

या पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार विश्वास नांदेकर आणि माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे यांनीही संजय खाडे यांच्या विजयाचा निर्धार केला. विकास पुरुष म्हणून सर्व मतदारांनी संजय खाडे यांचा प्रचार करून विजयी करण्याचे या दोन्ही नेत्यांनी आवाहन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर