ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

असंख्य लोकांच्या उपस्थितीत संजय खाडे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

श्री रंगनाथ स्वामी येथे वणीचा तर भांदेवाडा येथून ग्रामीण भागाचा प्रचार शुभारंभ

रॅलीत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व शिवसैनिक सहभागी

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला,रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष, हजारो लोकांचा सहभाग

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी – काल दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोज बुधवारी संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असुन श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन करून संजय खाडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

आणि भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथे दर्शन घेऊन ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ केला. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह नरेंद्र ठाकरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.प्रचाराच्या शुभारंभानंतर रंगनाथ स्वामी मंदिर ते जैताई मंदिर असा पायदळ मार्च काढण्यात आला.या मार्चमध्ये हजारो समर्थकांनी सहभाग घेतला.या मार्चने वणीकरांचे लक्ष वेधले. यावेळी समर्थकांनी जोरदार नारेबाजी करीत मार्चमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार केले.

काल सकाळी 10.30 वाजता संजय खाडे यांनी रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा करीत प्रचाराचा नारळ फोडला.त्यानंतर पायदळ मार्चला सुरुवात झाली.यावेळी समर्थकांनी वाजवलेल्या शिट्टीने वणीकरांचे लक्ष वेधले. दुपारी जैताई मंदिर येथे मार्चची सांगता झाली. त्यानंतर भांदेवाडा येथे संपूर्ण ताफा रवाना झाला.भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान येथे संजय खाडे यांनी नारळ फोडून ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ झाल्याचे जाहिर केले. 

विधानसभेत वाजणार शिट्टी – संजय खाडे
माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर गावखेड्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.अनेक सामाजिक संघटना, संस्था मला पाठिंबा देत आहेत.काँग्रेसचे जवळपास अर्धे अधिक कार्यकर्ते व नेते यांनी मला पाठिंबा दिला आहे.आजच्या रॅलीत देखील मोठ्या प्रमाणात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.अनेक शिवसैनिकही रॅलीत सहभागी होते. हा पाठिंबा पाहून यंदा वणी विधानसभा क्षेत्रात शिट्टी वाजणार हे नक्की आहे.
– संजय खाडे, अपक्ष उमेदवार

भांदेवाडानंतर संजय खाडे व समर्थकांनी वनोजा देवी, घोगुलधरा, वेगाव, वरझडी येथे जाऊन दर्शन घेतले.दरम्यान या मार्गावरील गावांना ताफ्याने भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शुभारंभ कार्यक्रमाला गौरीशंकर खुराणा, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच विश्वास नांदेकर यांचे समर्थक उपस्थित होते. मार्चमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर