ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

969 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा स्तुत्य उपक्रम

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते.प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ०४ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत असते.याचाच उपक्रम म्हणून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आज दि.१८ जानेवारी२०२५ रोज शनिवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी.६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून “रक्तदान महायज्ञास” हातभार लावला.यावेळी श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील टीमने रक्त संकलनाचे कार्य केले.आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल,अनेमिया,हिमोफिलीया, पॅलेसेमिआ,ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते.

यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत.तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून संस्थेसाठी आपला बहुमोल वेळ काढून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी होवून उपकृत करावे असे आवाहन संस्थानतर्फे कर करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून ४८ तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरुन निघते. रोग प्रतिकार शक्ती वाढते. नियमित ३-४ महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, होण्याचे प्रमाण कमी होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर