ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वेगावचा अभिमान: दोन शेतकरीपुत्रांची भारतीय सैन्यात थेट निवड

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गावात सत्कार समारंभ संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील वेगाव गावातील दोन शेतकरीपुत्रांची भारतीय सैन्यात थेट निवड झाल्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रणव पुरुषोत्तम सुर व वैभव अनंता ताजने या दोघांनी सैन्यात निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रणव सुर यांच्या वडिलांकडे चार एकर तर वैभव ताजने यांच्या वडिलांकडे पाच एकर शेती असून शेतकरी कुटुंबातील या तरुणांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर ही यशस्वी वाटचाल साध्य केली आहे.

या दोन्ही नवोदित जवानांचा सत्कार सोहळा बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सत्कार समिती अध्यक्ष किशोरजी ताटकोंडावार, गजाननराव खोले, बंडुजी मिलमिले, एल.आय.सी. अभिकर्ते विठ्ठलराव कळसकर, गुरुदेव प्रचारक पुंडलीकराव ताजने तसेच गावातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामरोजगार सहाय्यक योगेश्वर कापसे यांनी केले, तर आभारप्रदर्शन विठ्ठलराव कळसकर यांनी केले. या तरुणांच्या निवडीमुळे वेगाव गावासह पंचक्रोशीमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर