ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

युवकांना प्रेरणा देण्यासाठी ७ वर्षाची मनस्वी करणार ३० किमी स्केटिंग

934 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील (चिं) बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथे राहत असून मनस्वीने रोलर स्केटिंग मध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नांवावर केले आहे.ती जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट २०२१ , नॅशनल स्केटिंग चॅम्पियन २०२३ आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे.

मनस्वी नेहमीच एका नवीन विक्रमाला गवसणी घालते २६ जानेवारी २०२४ रोजी मनस्वीने बोटोणी ते मारेगाव बेटी बचाओ – बेटी पढाओ करीता सलग १२ किमी स्केटिंग  केले होते.आपल्या भागातील युवकांना आपल्या पासून प्रेरणा मिळावी व त्यांचा जास्तीत जास्त कल खेळाकडे व्हावा याकरिता येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी चिं बोटोणी ते वणी ३० किमी चे अंतर स्केटिंग द्वारे पूर्ण करून ३० किमी स्केट फॉर युवा ह्या प्रेरणात्मक संदेश मनस्वी देणार आहे.

स्केटिंग रॅलीची सुरुवात बोटोणी येथून २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता होणार असून मनसे नेते मा.श्री. राजुभाऊ उंबरकर यांच्या सह प्रमुख उपस्तीथी मध्ये वणी विधानसभा आमदार श्री.संजयभाऊ दरेकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,भाजपा नेते विजुभाऊ चोरडिया, कृउबा समिती मारेगाव सभापती गौरीशंकर खुराणा,अध्यक्ष वसंत जिनींग वणी आशिष कुळसंगे ,संजय खाडे संचालक महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ मुंबई,तहसिलदार उत्तम निलावाड,ठाणेदार संजय सोळंके,आणि लायन्स स्कुल वणी अध्यक्ष बलदेव खुंगर हे हजर राहणार असून

प्रमुख पाहुणे बोटोणी येथील सरपंच सौ.सुनीताताई जुमनाके,माजी प.स.सदस्या सुनीताताई लालसरे आणि चि बोटोणी येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व निमंत्रित सर्व पत्रकार बंधु व इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब मारेगाव यांची उपस्थिती राहील, स्केटिंग रॅली दरम्यान मनस्वीचे प्रशिक्षक मा विजय मलजी सर हे मनस्वीला विशेष  मार्गदर्शन करणार आहे.

स्केटिंग रॅलीचा समारोप  शिवाजी पुतळा वणी येथे सकाळी अंदाजे १०.३० ते ११ वाजता दरम्यान होईल.हि स्केटिंग रॅली यशस्वी होण्यासाठी बजरंग दल ,गुरुदेव सेवा मंडळ ,छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान,तथागत युवा मंडळ ,माँ शेरा वाली क्रिकेट क्लब बोटोणी व बोटोणी येथील समस्त ग्रामस्थ याचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर