ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

868 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

असंख्य झाडे कोलमडली,मार्की झरी,झरी घोन्सा मार्ग बंद

विजेचे खांब व तारा तुडल्या विजप्रवाह खंडीत

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी :मृग नक्षत्राच्या  सुरुवातीला दिनांक ९ जुलै रात्री    विजांचा कडकडाट , सुसाट्याचा वाऱ्यासह पावसाच आगमण झाले आहे. कपासाची धुळ पेरणी करिता पाऊस फायदा चा होणार असुन  पेरणीच्या कामाला ही वेग आला आहे. हा पाऊस शेती साठी उपयुक्त असाला तरी वादळी वाऱ्यांनी  घरदार, गोठे , पॉलीहाऊस ,शेड  , विधुत खांबाचे मोठे नुकसान झाले आहे.

रात्री रोद्र रूप धारण केलेल्या वादळीपावसाने शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळू पडली आहे. मुकुटबन झरी मार्गावर मार्की बु ते मुच्ची फाटा दरम्यान रस्यावर मोठ झाड कोसळल्याने हा मार्ग दिवस भर बंद आहे. तर झरी घोन्सा मार्गावर आडकोली गावाजवळ सागवान वृक्षाची अनेक झाडे रस्यावर उन्मळून पडली त्यामुळे हा मार्ग रात्री पासुन बंद आहे.

या मुळे वणी झरी बस सेवा दिवसभरबंद बंद आहे. या मुळे या मार्गा वरिल प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. जंगल परिसरात व शेतशिवारातील मौल्यवान सागवान वृक्ष कोसळल्याने वन विभाचे व शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सोबत इतरही झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुसाटाच्या वाऱ्यांने अनेकांच्या घरावरील गोठ्या वरिल पत्रे उडाली असुन अन्न धान्य,जनावारांचा चारा शेतात साठविलेले रासायनिक खत पावसाने भिजले आहे.खडकडोह,चिंचघाट,पवणार गणेपूर, पांढरकवडा ,अर्धवन,मार्की,जामणी या परिसाला यावादळी पावसाचा चांगला च तडाका बसाला असुन चोवीस तास उपर उलटूनही विद्यूत पुरवढा सुरळीत झाला नव्हतापरिणामी पाणी पुरवठा बंद असून  विद्यूतवर चालणारी सारी यंत्रणा कोलमडून गेली आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर