ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

रस्त्यासाठी जमिनी देणारे
शेतकरी अखेर  बसले उपोषणाला

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

20 वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षेत

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:– आपल्या परिसराचा विकास व्हावा ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी आपल्या जमिनी दिल्या. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे तब्बल 20 वर्षांपासून या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे रस्त्यासाठी त्याग नाही. करणाऱ्यांच्या जगण्याचा मार्ग खडतर बनला आहे. अशा हतबल शेतकऱ्यांनी शेवटी मंगळवारपासून यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

झरी-पांढरकवडा परिसरातील सुर्ला, गोधणी परिसरातील हे शेतकरी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. या शेतकऱ्यांनी 2003 मध्ये सुर्ला- गोधणी या रस्त्यासाठी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. यात 27 शेतकरी बाधीत झाले आहेत. परंतु, शासन नियमानुसार त्यांना आजपर्यंत जमिनीच्या मोबदल्याचे पैसे मिळालेले नाही. या शेतकऱ्यांनी पांढरकवडा एसडीओंकडे वारंवार हेलपाटे मारूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनीच यात तोडगा काढावा, अशी अपेक्षा घेऊन या शेतकऱ्यांनी यवतमाळ गाठले. आझाद मैदानात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळात जमिनी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. किमान जमिनीचा मोबदला मिळाला असता तर इतर ठिकाणी जमीन घेवून शेती करता आली असती.

किंवा अन्य व्यवसाय तरी करता आला असता. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मोबदल्याबाबत उदासीन धोरण अवलंबले आहे. त्यातून काळजीपोटी काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून तातडीने मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रंजित तोडासे, मधुकर पवारकर, बबन पाचभाई, मारोती धोबे, जगन पाचभाई, शंकर मंडाळी, दशरथ मेश्राम, मधुकर काकडे, शंकर कोडापे, विलास गोरे, नामदेव मंडाळी, गयाबाई कोडापे, मिराबाई धोबे, जनार्धन धोबे, घागरू मंडाळी आदी शेतकरी उपोषणाला बसले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर