ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात पावसाचे थैमान

1.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सततच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे.तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे. तर आज दिनांक 9 जुलै 2025 रोज बुधवारला दुपारी पासुन कोसारा पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे.

प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.दोन दिवसा पासून सुरु असलेल्या सततधार पावसाने संम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घराबाहेर कोनालाही पडण्याची संधी मिळाली नाही. शेतकऱ्यांची शेती कामे खोळबली आहे. शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजूरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले.पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी ओसांडून वाहत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी तुडुंब भरलेले आहेत.

तालुक्यातून वाहणारी वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोसारा पूल पाण्याखाली आला असून या पुलावरून सुमारे 2 ते 3 फूट एवढे पाणी वाहत आहेत. पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मारेगाव तालुक्यातील अनेक गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील मार्डा येथील डॅमवरूनही पाणी ओसंडून वाहत आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दोन दिवसा पासुन सतत सुरु असलेल्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत. हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली आहे. तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत असून नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तालुक्यातील महसुल प्रशासन व पोलिस प्रशासन पुर परस्थिती असलेल्या ठिकाणी भेट देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर