ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिवजयंतीनिमित्त हिवरी गावातील युवकांनी ठेवला समाजासमोर आदर्श.

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गावातील ७५ वर्षाच्या नागरिकांचा केला सत्कार.

शिवप्रतिष्ठान हिवरी यांचे वतीने उत्कृष्ट उपक्रम राबविन्यात आला.

सुरेश पाचभाई मारेगाव:- देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हिवरी गावातील युवकांनी शिवजयंती निमित्त गावातील 75 वर्षाच्या नागरिकांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

देशात विविध क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त असलेल्या नागरिकांचा सत्कार होत असतो परंतु देशाचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील 75 वर्षाचा जेष्ठ नागरिकांचा सत्कार करणारा हिवरी हा एकमेव गाव असल्याचे निदर्शनास आलेले आहेत.

ह्या अभिनव उपक्रमाची दखल सर्वत्र घेत असून शिवप्रतिष्ठान हिवरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहेत.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच सौ.इंदिराताई पिदुरकर तर शुभम पिंपळकर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थीत होते.तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप आस्वले,उपसरपंच अजय राठोड,शाळा समिती अध्यक्ष ईश्वर थेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन संतोष आस्वले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत भगत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिवरी मार्फत करण्यात आले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर