ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. इंदिराताई पीदुरकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर थेरे उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराजजी आस्वले, गावातील ज्येष्ठ नागरिक गजानन पाटील, भगत विजयजी बोबडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा तृप्ती सोमलकर, निलेश डावरे, अंगणवाडी सेविका फुलपात्र आत्राम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गरिबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर, सामाजिक व लोककला आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला, हस्ताक्षर, निबंध आदी स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तके व पेन देऊन गौरविण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्र व बॉटल देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वावरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक स्वप्नील नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. याबद्दल मुख्याध्यापक नवघरे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर