ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

संघर्षाशिवाय जीवनात यश मिळत नाही विस्तार अधिकारी गणेश भोयर

335 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथील सत्कार प्रसंगी काढले उद्गार

सुरेश पाचभाई मारेगाव

जोपर्यंत जीवनामध्ये संघर्ष केल्या जात नाही तोपर्यंत यश पदरात पडत नाही. क्षेत्र कोणतेही असो, जिथे संधी मिळेल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटवा.जग प्रेमाने जिंकता येते पैशाने नाही, असे उद्गार नव्यानेच विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले  गणेश भोयर यांनी काढले.

ते जिल्हा परिषद शाळा मार्डी येथे शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी दुसरे विस्तार अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर देऊळकर हेही उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुलोचना कासार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,

प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील,पोलीस पाटील मार्डी, चित्रा बोंडे केंद्रप्रमुख, अनिता नालमवार मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा मजरा, नसीमा शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पौर्णिमा शेंडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्या,नंदकिशोर कांबळे, पौर्णिमा शेंडे उपस्थित होत्या.

सत्काराला उत्तर देताना गणेश भोयर पुढे म्हणाले की, संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. बी. एड. पासून तर मुख्याध्यापकाचे प्रमोशन होत पर्यंत तसेच विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन होत असतानाही मला संघर्ष करावा लागला. पण मी हार मानलेली नव्हती अखेर माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि आज मला विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली.

यावेळी दुसरे विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले ज्ञानेश्वर देऊळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.तसेच चित्रा डहाके, आरती रहाने, चंद्रकांत सुके, चित्रा बोंडे आणि अनिता नालमवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी लोहकरे, प्रास्ताविक राजेश मारोडकर तर आभार संयोगिता चिरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मार्डी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर