ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

विद्यार्थ्यांनी ध्येयाचा सातत्याने पाठलाग करावा – आमदार संजय देरकर

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहोत, अशी कोणतीही हीन भावना न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे. ध्येयप्राप्तीसाठी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून, कोणत्याही अडचणींना न घाबरता आपल्या ध्येयाचा प्रामाणिकपणे पाठलाग करावा, असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी केले.

ते मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील श्री जगन्नाथ महाराज विद्यालय येथे आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.किसान शिक्षण प्रसारक समिती, वेगाव द्वारा संचालित श्री जगन्नाथ महाराज विद्यालयात दि. २२ व २३ जानेवारी रोजी हे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, कला, नृत्य व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले.

उद्घाटनप्रसंगी वेगावच्या सरपंच सौ. उषाताई अनिल देरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रा. डॉ. प्रसाद अरुण खानझोडे, मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे, उपसरपंच दिपक कळसकर, मुख्याध्यापक नरेश वाघमारे, प्रशांत देरकर, रविंद्र नगराळे, दिनेश मोहितकर, अनंता ताजने, सुनिताताई बनसोड, ज्ञानेश्वर किंगरे, पद्माकर कडू, वसंत सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश गौरकर यांनी तर आभार प्रदर्शन कलावती कुडमेथे यांनी केले.



स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या समारोपीय व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका व एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. किरणताई संजय देरकर या होत्या. यावेळी बक्षीस वितरक म्हणून माजी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विठ्ठलराव जीवतोडे, शिक्षण विस्तार अधिकारी कु. संगीता गारघाटे, सुभाष चिकटे, वसंतराव काकडे, मुख्याध्यापक नरेश वाघमारे, सुरेखाताई ढेंगळे (तालुका प्रमुख, शिवसेना महिला आघाडी, वणी), मिनाक्षीताई मोहीते, अश्विनीताई ढेंगळे, प्रतिक्षाताई पेंदोर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अनिल पेचे यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र खोके यांनी केले.या दोन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी माधव कोहळे, पंकज राठोड, वैशाली मोवाडे, सागर कडू, लौकिक आसुटकर, श्रावणी शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर