ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

15 ऑगस्टला मारेगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा.

310 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्याने मारेगावात 15 ऑगस्टला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मारेगाव तालुका पत्रकार संघटना, क्रांती युवा संघटना, आणि जनहित कल्याण संघटना याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराना, राहणार असून प्रा. दिलीप अलोणे, प्रा. सतीश पांडे, तहसीलदार दीपक पुंडे,पोलीस निरीक्षक राजेश पुरी,

गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, माजी प्राचार्य भास्कर धानफुले, कृषी अधिकारी सुनील निकाळजे, मारेगाव नगरपंचायतीचे मुख्याधीकारी अभिजित वायकोस, वन परीक्षेत्र अधिकारी शंकरराव हटकर, मारेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाँ. प्रिया वानखेडे,वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुहास पाटील, जनहित कल्याण संघटनेच्या सदस्या शीतल पोटे,गुणवंत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात तालुक्यातील प्रत्येक शाळा, कालेज मधून प्रथम येणाऱ्या विदयार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान चिन्हासह व भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पत्रकार संघांचे अध्यक्ष सुमित हेपट, भास्कर राऊत, माणिक कांबळे, मोरेश्वर ठाकरे,सुरेश पाचभाई,सुरेश नाखले, आनंद नक्षणे, भय्याजी कनाके गजानन आसूटकर, धनराज खंडरे, गजानन देवाळकर, सुमित गेडाम, रोहन आदेवार,मारेगाव तालुका पत्रकार संघ,क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

पालकांनी सहभागी व्हावे-खुराणा
15 ऑगस्टला आयोजित विदयार्थी गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विदयार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा सहभागी व्हावे.
गौरी शंकर खुराणा,जनहित कल्याण संघटना मारेगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर