ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

गुरुपौर्णिमेनिमित्त साई मित्र परिवाराचा १७ वा रक्तदान महायज्ञ,श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संगम; रक्तदान शिबिर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रेचे आयोजन

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव “रक्तदान हेच श्रेष्ठ दान, गुरुसेवा हीच खरी साधना” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत मारेगाव येथील साई मित्र परिवार यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त सलग १७ व्या वर्षी रक्तदान महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे मारेगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या १७ वर्षांपासून साई मित्र परिवार रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणिवेतून सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. या उपक्रमातून आजवर शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळवून दिले असून, रक्तदानाबाबत समाजात व्यापक जनजागृतीही झाली आहे.

यंदाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जगन्नाथ महाराज मंदिर, मारेगाव येथे वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी, यवतमाळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

त्यानंतर बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाप्रसाद तर सायंकाळी ५ वाजता जगन्नाथ महाराज मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. साईनामाच्या अखंड गजरात, भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपूर्ण मारेगाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

गुरुपौर्णिमा महोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून मानवतेची सेवा, सामाजिक एकोपा आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे साई मित्र परिवाराने नमूद केले आहे.

या पवित्र सोहळ्यात मारेगाव व परिसरातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याच्या या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, तसेच महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन साई मित्र परिवार, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर