ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

युवकाने कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगाव येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करून  आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तरुणाचे नाव राहुल शंकर मेश्राम (वय 23) असे असून, तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास राहुल घरात असताना  कीटकनाशक प्राशन केले. घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, चंद्रपूरकडे नेत असताना वाटेतच राहुलची हालचाल बंद झाली.त्यामुळे पुन्हा मारेगाव ग्रामीण रुग्णालयात त्याला नेले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किसन संकुरवार करीत आहेत.

ग्रामीण भागातील वाढत्या आत्महत्या चिंताजनक

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरुणांच्या आत्महत्येच्या घटना वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आर्थिक अडचणी, मजुरीवर आधारित कुटुंबाचा भार, तसेच सामाजिक-मानसिक ताण या कारणांमुळे तरुण आत्मघातकी पावले उचलत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर