ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे मनस्वी पिंपरे सन्मानित

128 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला, होता 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळविणाऱ्या  खेळाडू तथा सहभागी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.

मुळगाव चिं. बोटोणी,तालुका मारेगाव सध्या राहणार कोंढवा बुद्रुक , पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिने मुलीच्या 5 ते 7 वयोगटात महाराष्ट्र राज्यासाठी कांस्य पदक पटकाविले होते,तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण व एक रजत पदक मिळविले होते तिच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री.पी के सिंह सर,टीम इंडिया कोच श्री.श्रीपाद शिंदे सर,पुणे स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष श्री.राजेंद्र जोशी सर आणि कल्याण पत्रकार संघ अध्यक्ष श्री.अविनाश ओंबासे सर यांच्या हस्ते मनस्वीला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी, कात्रज पुणे येथे प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शना खाली शिकत आहे. नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप पदक मिळविण्यासाठी मनस्वी एक वर्षापासून कठीण मेहनत घेत आहे.मनस्वी वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी नॅशनल स्केटिंग चॅम्पियन झाली असून येत्या काळात एशियन गेम्स सारख्या स्पर्धा मधून भारत देशासाठी नक्कीच सुवर्ण पदक मिळवेल.अशी आशा तिच्या पालकांनी व्यक्त केली.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर