ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सगणापुर येथे अज्ञात इसमाने लावली चण्याच्या गंजीला आग.

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चण्याच्या ढग जळून खाक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील सगणापुर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याचा शेतातील चण्याच्या गंजिला अज्ञात इसमाने आग लावलली. या घटनेत शेतातील जमा करून ठेवलेला चण्याचा ढीग जळून खाक झाला.यात शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

सविस्तर वृत्त असे की.
वणी येथील शेतकरी विठ्ठल झोलबाजी वैद्य यांची सगणापुर येथे 9 एकर शेती आहे.त्यांनी या वर्षी शेत गट नंबर 11/3 मध्ये 3 एकर चना पिकांची लागवड केली होती व ऊर्वरीत शेतात गहु आणी कपाशी या पिकांची लागवड केली होती.सध्या परीसरात चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे.

त्या मुळे विठ्ठलराव यांनी सुद्धा आपल्या शेतातील चना पिकांची कापणी सुरू केली व गावालगच्या शेतात गंजी लावुन ठेवली होती.काल सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी गेल्यानंतर शेताकडे काही तरी जळत असल्याचे निदर्शनास येताच सालगडी व गावातील काही नागरीकांनी लगेच शेताकडे धाव घेतली शेताकडे गेले असता त्यांना शेतातली चण्याची गंजी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्या मुळे ही घटना उघडकीस आली.

अज्ञात इसमाने शेतातील हरबऱ्याच्या गंजीला आग लावल्या मुळे शेतकऱ्यांचे सुमारे 8 ते 10 किंटलचे नुकसान झाले आहे.त्यांनी लगेच मारेगांव येथील पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.अज्ञात आरोपी वर कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जमादार भालचंद्र मांडवकर करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर