ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नरसाळा येथे हरिपाठ स्पर्धेचे आयोजन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भक्तिमय वातावरण

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नरसाळा ग्रामवासी व कृष्णकुंज हरिपाठ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भव्य हरिपाठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी हनुमान देवस्थानाच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. १६,०००, रु. १४,००० व रु. १२,००० अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच चौथे ते सहावे क्रमांकासाठीही रु. १०,०००, रु. ७,००० व रु. ५,००० अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट वादक, गायक व संयोजनासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ५०० असून, नोंदणीची अंतिम वेळ रात्री १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. उशिरा नोंदणी करणाऱ्यांसाठी लेट फी रु. ७०० निश्चित करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. परीक्षक म्हणून क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यक्रमात मोठ्या संख्येने हरिभक्त सहभागी होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर