ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ठाणेदार उमेश बेसरकर यांना मारेगाव पोलीस ठाण्यात अभिवादन

663 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पोलीस ठाण्यात आज एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या स्मृतीस पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावनांना अभिव्यक्त केले.

आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला दुपारी 12.30 वाजता पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सहकाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तर चेहऱ्यावर उमेश बेसरकरांप्रती अपार आदर दिसून येत होता.

कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी “कर्तव्यदक्ष व जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर असलेले अधिकारी” अशी आठवण सर्वांच्या तोंडी होती.

हा श्रद्धांजली कार्यक्रम साधा असला तरीही त्यात दडलेला सहकाऱ्यांचा भावनिक ओलावा मारेगाववासीयांच्या मनात कायम राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रम मध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे,विकी जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत पाटील व इतर कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर