ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगावात मेच्या तडाख्यानंतर पावसाची दमदार एन्ट्री; नागरिकांना मोठा दिलासा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुरेश पाचभाई | मारेगाव


मारेगाव मे महिन्याच्या सुरुवातीलाच मारेगाव तालुक्यात उन्हाने अक्षरशः आग ओकली होती. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा तब्बल ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता, तर उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

अशा असह्य उकाड्यानंतर गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मारेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या दमदार पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणला. दुपारपर्यंत कडक उन्हाने हैराण केलेल्या नागरिकांना अचानक काळ्या ढगांनी वेढा घातला आणि काही क्षणांतच जोरदार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर येत पावसाचा आनंद घेतला. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला, तर शेतकरी वर्गामध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

मे महिन्याच्या प्रचंड तडाख्यानंतर आलेल्या या पावसामुळे काही काळासाठी का होईना, पण मारेगावकरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अचानक बदललेल्या हवामानामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर