ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

गोंडबुरांडा येथील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील घटना.

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज दिनांक 20 मे 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गोंडबुरांडा येथील येथील एका 21वर्षीय नवविवाहितेची स्वतःचा राहत्या घरी दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली. नवविवाहितेच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरलेली आहे.

मारेगांव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील सौ.रीना सुनील मुसळे हिचा प्रेमाविवाह सन 2022 मध्ये सुनील मुसळे वय 30 वर्षे याचेशी झाला होता.तो आपल्या आईवडिलांसह गोंडबुरांडा या गावी राहत होता.रीना आणि सुनील यांचा संसार सुखाने चालला असतांना आज सायंकाळी रिनाने अचानक राहत्या घरी छताला नायलॉन दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

कुटुंबीय सायंकाळी शेतातून घरी परत आले असता त्यांना रीना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविला असुन या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करीत आहे.


ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर