ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावेश न करण्याबाबत व इतर मागण्यासाठी अदिवासी समाज बांधवाचे  निवेदन

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी :महाराष्ट्र राज्यात ‘बंजारा’ समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश होऊ नये, या मागणीसाठी मंळवार दि २३ सप्टेंबर  रोजी  झरीजामणी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाने मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आदिवासी विकासमंत्र्यांना तहसीलदार मार्फत  निवेदन सादर केले.

त्यांच्या मते ‘बंजारा’ समाजाचा उगम व्यापारी व भटक्या समाजात असून त्यांनी आदिवासींच्या घटनात्मक निकषांपैकी एकही निकष पूर्ण केलेले नाहीत. १९५० च्या राष्ट्रपती आदेशात व पुढील सुधारणांमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या यादीत नाही. तसेच १९५३ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने व मुंबई राज्याच्या यादीनुसार बंजारा/लंबाडा समाज ओबीसी प्रवर्गात नोंदविला आहे.

१९७९ मध्ये महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र निकष पूर्ण न झाल्यामुळे तो प्रस्ताव १९८१ मध्ये मागे घेण्यात आला होता. “४४ वर्षांपूर्वी जे निकष पूर्ण झाले नाहीत, ते आता २०२५ मध्ये कसे पूर्ण होऊ शकतात, हा मोठा प्रश्न आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रमुख मागण्या पुढील प्रमाण आहे.
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये.
मा. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आदिवासी आमदारांची बैठक घेण्यात यावी.

जात पडताळणी कायदा २००० मध्ये सुधारणा कराव्यात.
शासनातील ८५ हजार रिक्त पदे व आदिवासी आरक्षणातील रखडलेली १२,५०० पदे तात्काळ भरण्यात यावीत.अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यातील संवर्ग पदांची भरती व नियुक्त उमेदवारांना कायम करण्यात यावे.आश्रम शाळांमधील खाजगीकरणाचा GR रद्द करून वर्ग ३ व ४ कर्मचारी पुन्हा नेमण्यात यावेत. DBT पद्धतीतून विद्यार्थ्यांना होस्टेलबाहेर काढण्याची प्रथा बंद करण्यात यावी. अशा मागण्या चे निवेदन आदिवासी वतीने देण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर