ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून टीडीआरएफ जवानांचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी:-नुकतेच काही संघटनांच्या युवकांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी करून निवेदन दिल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते.

या विषयाला महत्व देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या TDRF च्या जवानांनी हि जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचाराचे जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी दिनांक ०७/११/२०२२ रोजी सर्व तालुक्यातील तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

खाजगी शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार या विषयी नेहमीच जनजागृती व प्रशिक्षण तेथील विद्यार्थी व शिक्षकांना दिले जाते. परंतु जि.प. शाळांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतानाही त्याचे योग्य ज्ञान नसल्याने बरेचदा जीवितहानी किवा शारीरिक हानी त्याठिकाणी होत असते. प्रत्येक शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी(First Aid Box) उपलब्ध असतो परतू त्यातील साहित्याचा उपयोग माहित नसल्याने विद्यार्थी व शिक्षक त्याचा उपयोग करून योग्य प्रथमोपचार करू शकतील.

जर या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचाराचे ज्ञान दिल्यास शाळेतच नाही तर समाजात इतरत्र वावरत असताना अशी कोणतीही दुर्घटना घडल्यास किवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हेच विद्यार्थी व शिक्षक एक जागृत नागरिक म्हणून तेथे मदत करू शकतील सोबतच उपलब्ध असलेल्या साधनांनपासून प्रथमोपचार करू शकतील आणि याचा प्रशासनालाही नक्कीच फायदा होईल.

त्याकरिता जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माद्यामिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचार विषयाचे अधिकृत प्रशिक्षक असलेल्या प्रशिक्षकाकडून व प्रशिक्षण संस्थेकडून दोन दिवसीय प्रथमोपचाराचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह देण्यात यावे व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती (DPDC) कडे सादर करून तो मंजूर करून लवकरात लवकर प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी TDRF जवानानकडून निवेदनात करण्यात आली.

झरी तालुक्यामध्ये TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, मनिष आवारी ,लक्ष्मीकांत गाडगे,अक्षय आवारी,संकेत काळे ,शुभम कामटवार,नयन पारशिवे, संकेत बोरवार, सौरभ गोडे, साहिल मडवी ,संघर्ष वाघमारे इत्यादी TDRF अधिकारी व जवानांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर