ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात:मुरूड येथे शिंदे गट – काँग्रेसची हातमिळवणी; ठाकरे गटाची ‘द मुरुड फाईल्स’ म्हणत टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढवला आहे. शिवसेनेने काँग्रेसशी युती करून ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात बुडवले, असे ते म्हणालेत. त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटेच्या प्रकरणात राज्य सरकार संविधानद्रोह करत असल्याचाही आरोप केला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यात एकमेकांचे घोर विरोधकही एकत्र येण्याच्या घटना घडत आहेत. त्यात सत्ताधारी शिंदे गटानेही काँग्रेसशी युती करून आपला वेगळा मार्ग निवडला आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेससोबत गेल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. पण आता त्यांनीच काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ धारशिवच्या उमरगा नंतर सादर आहे शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, ‘द मुरुड फाईल्स’. शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ. यंदा ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. या प्रकरणी त्यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे शिवसेनेने काँग्रेससोबत युती झाल्याचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यात काँग्रेस नेते बॅरिस्टर अंतुले यांचा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय धनुष्यबाण व पंजा या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हासह ‘आता मुरुडच्या विकासाला शिवसेना व काँग्रेसची साथ’ अशी टॅगलाईनही या पोस्टरवर दिसून येत आहे. दानवेंची टीका ही प्रसिद्धीसाठी – शिंदे गट दुसरीकडे, शिंदे गटाचे रायगडचे उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांनी अंबादास दानवेंवर सवंग प्रसिद्धीच्या लोभापायी शिवसेनेवर टीका केल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे शिलेदार योग्य पद्धतीने बाळासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करत आहेत. तुम्ही जिथे राहता तिथे एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणून दाखवा. तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी अशी टीका करतात. तुम्ही शिंदेंवर बोलला नाहीत, तर एकही दिवस उजेडात येऊ शकत नाही. शिंदे हे महाराष्ट्राचे वाघ आहेत. तर तुम्हाला जनतेने घरी बसवले आहे. त्यामुळे तुम्ही घरीच बसा, असे त्यांनी म्हटले आहे. हा संविधानद्रोह हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारवर संविधानद्रोह केल्याचा आरोप केला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे जर या सरकारला मान्य असेल तर सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. सरकारने यापूर्वी जो न्याय राहुल गांधी यांच्या खासदारकी आणि सुनील केदार यांच्या आमदारकीसाठी लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लागू व्हायला हवा. सरकार निर्लज्जपणे हायकोर्टाच्य कामकाजाची वाट पाहत असेल तर हा संविधान द्रोह आहे, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वछ आहे, असे दानवे म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर