ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ग्रामीण महाराष्ट्राची तहान भागणार; 2027 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी:ड्रोन-रोबोटिक्स क्षेत्रासह वैद्यकीय प्रकल्पासंबंधित निर्णयांनाही मंजुरी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आता शुद्ध आणि नियमित पाण्याचा प्रवाह अखंड राहणार आहे. राज्यातील जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ ला मंजुरी देण्यात आली आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या संकल्पनेला गती देत, २०२७ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले आहे. याशिवाय ड्रोन धोरण, नागपूरला वैद्यकीय प्रकल्प आणि प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेचे महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेला गती ग्रामीण रोजगार व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७’ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपालांच्या मंजुरीने अध्यादेश काढला जाईल. ग्रामीण भागांचा विकास केंद्रभागी ठेवणारे निर्णय प्रशासकीय विभागांचे विभाजन करून त्यांची संख्या वाढवल्याने प्रत्येक क्षेत्रावर सूक्ष्मपणे लक्ष केंद्रित करणे सरकारला शक्य होईल आणि प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढेल. नागपूरच्या महत्त्वपूर्ण सायक्लोट्रोन प्रकल्पामुळे विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणासारख्या शेजारील राज्यांतील कर्करुग्णांचा प्रवास खर्च आणि वेळ वाचेल, तसेच त्यांना आधुनिक उपचार सहज उपलब्ध होतील. तसेच, पाणी योजनेत स्काडा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने पाण्याचे योग्य वाटप होऊन पाण्याचा अपव्यय थांबून ग्रामपंचायतींच्या महसुलात आणि कार्यक्षमतेत शाश्वत वाढ होणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल. राज्यात आता ३३ ऐवजी ४६ प्रशासकीय विभाग असतील प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन करून ‘माहिती व जनसंपर्क’ आणि ‘राजशिष्टाचार’ हे स्वतंत्र विभाग करण्यात आले. तसेच गृह, कृषी, सहकार, उद्योग, महसूल, शिक्षण आणि पर्यटन या विभागांचेही विभाजन झाल्यामुळे एकूण प्रशासकीय विभागांची संख्या ३३ वरून ४६ झाली आहे. पाणीपट्टीची वसुली महिला बचत गटांकडे, ॲपद्वारे गळतीवर लक्ष नव्या पेयजल धोरणानुसार घरगुती पाणीपट्टी दर प्रतिमहिना १५० ते ४०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. याची शंभर टक्के वसुली स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक राहील. पाणीपट्टी वसुली आणि देखभालीची जबाबदारी महिला बचत गट आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना प्राधान्याने दिली जाईल. पाणी चोरी रोखण्यासाठी ॲपद्वारे देखरेख ठेवली जाईल. ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण-२०२६’ ला मंजुरीसह अनेक निर्णय कर्करोग निदान व उपचारांना गती देण्यासाठी नागपूरच्या भानसोली (हिंगणा) येथे ३०० कोटींचा ‘हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प’ उभारला जाईल. नागपूरमध्ये एम्स, नँशनल कँन्सर इन्स्टिट्युट आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे.त्यामुळे मुंबई, हैदराबादवरील अवलंबित्व कमी होईल. ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६’ मुळे सुमारे २५ हजार कोटींची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. तसेच या माध्यमातून एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. पर्यावरण संरक्षण आणि कृषी फवारणीसाठी बचत गटांतील एक हजार महिलांना प्रमाणित ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित केले जाईल. गावागावात हाय-स्पीड इंटरनेटसाठी ‘महानेट’ ग्रामीण भागात हाय-स्पीड ब्रॉडबँड आणि फोरजी नेटवर्क पोहोचवण्यासाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कंपनीच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. तसेच ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी रोजगार हमी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर