ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का:महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप; मनोहर मढवी यांची शिंदे सेनेकडे वाटचाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वातावरण अधिक तापू लागले आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची मानली जात असताना, त्यांना सलग धक्के बसू लागले आहेत. दहिसरमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकपदाच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेतही ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. नवी मुंबईतील ठाकरे गटाचे प्रभावी नेते मनोहर मढवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अस्वस्थता अधिकच वाढली असल्याचं चित्र आहे. मनोरहर मढवी यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केलं. मी कोणत्याही राजकीय दबावाखाली नाही, तर पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेत आहे, असं सांगत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं जाहीर केलं. कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामं होत नसल्याची खंत व्यक्त करत, संघटनात्मक पातळीवर निर्णयक्षमता आणि पाठबळ आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी मला खात्री आहे, असं मढवी म्हणाले. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत, बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा आदर कायम राहील, असंही ठामपणे सांगितलं. शिंदे प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणार दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मुंबईतील सर्व आमदार, खासदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनिती, उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यानंतर लोकसभा विभागनिहाय मेळावे आणि बैठकांचे सत्र सुरू होणार असून, शिंदे स्वतः या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणार असल्याचं समजतं. संवाद साधण्यासाठी खासदार आणि आमदारांना विशेष जबाबदाऱ्या याशिवाय, ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील निवडणुका पार पडल्या आहेत, त्या मंत्र्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा भेटी देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकांपूर्वी विविध समाजघटक, व्यापारी संघटना आणि व्यावसायिक संघटनांशी संवाद साधण्यासाठी खासदार आणि आमदारांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातही आजपासून शिंदे गटाकडून बैठकांचे सत्र सुरू होत असून, प्रत्येक महानगरपालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी खासदार श्रीकांत शिंदे व गोपाळ लांडगे, मीरा-भाईंदरसाठी मंत्री प्रताप सरनाईक, नवी मुंबईसाठी खासदार नरेश म्हस्के, तर वसई-विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत समन्वय साधणार आहेत. राज्यातील राजकीय शक्तिपरीक्षण ठरणार या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार करता, आगामी महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, राज्यातील राजकीय शक्तिपरीक्षण ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ठाकरे गटातून एकामागोमाग एक नेत्यांचा बाहेर पडणं आणि शिंदे गटाची वाढती संघटनात्मक ताकद, यामुळे राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत आहेत. नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात मनोहर मढवी यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी कोणते नेते पक्षांतर करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर