ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

जेफ्री एपस्टीन तुरुंगात मृत सापडला:भोंदू अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. जितेंद्र आव्हाड विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले, अशोक खरातने बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा 2007 मध्ये खून केला. नाशिकमध्ये याची शांतपणे चर्चा सुरू होती. तेव्हा कुणीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. या प्रकरणी एका वृत्तपत्रात 10 लेख लिहून आले. त्यामुळे अशोक खरात पत्रकारांना माहिती नव्हता, पोलिसांना माहिती नव्हता, महाराष्ट्राला माहिती नव्हता असा भाग नाही. मग हा गुप्तहेर यंत्रणेचे अपयश नाही का? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देणे गरजेचे होते की नाही. या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे कुणाला माहिती असेल तर ते केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच ठावूक आहे. चांगले अधिकारी तिथे जाऊन लोटांगण घालत आहेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, या प्रकरणात चांगल्या – चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. चांगले-चांगले अधिकारी तिथे जाऊन लोटांगण घालत आहेत. मी खात्रीने सांगतो की, अशोक खरातच्या माध्यमातून काहीजण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे. हे लोक अशोक खरातकडे पुजा घालण्यासाठी गेले होते. वेळ येईल तेव्हा नाव उघड करू. ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यांपूर्वी मिळाली होती. थोडे दिवस द्या मुख्यमंत्री घरी गेलेले असतील अशी हमी अशोक खरातने या लोकांना दिली होती. अशा प्रकारच्या पुजेला, जादूला राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू तर हे खूप वाईट आहे. करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट उपलब्ध असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, अशोक खरातच्या ठिकाणांवर सरकारी पैशांच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या व रस्ते बांधण्यात आले. एवढा कोण मोठा आहे तो खरात? कुठला काळ्या जादूवाला आहे. वाईट या गोष्टीचे वाटते की, या संत तुकारामांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला एवढी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते असे समस्त आमदारांना वाटायला लागले आहे. तिकडे जाऊन करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट आहे. अशी कशी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली? हा खरात वेगवेगळ्या खात्यातील बदल्याही करत होता, असे आव्हाड आपला संताप व्यक्त करताना म्हणाले. अशोक खरातला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अशोक खरातला कायम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, इराणचे युद्ध हे केवळ जेफ्री एपस्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून सुरू आहे. जेफ्री एपस्टीनला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी पटलावर आल्या तर सर्वकाही संपेल. त्यामुळे त्याचे काही बाहेर येऊनच नये म्हणून त्याला ठेवलेल्या सेलमध्ये 1 मिनिट 30 सेकंदांचा अंधार होतो आणि जेफ्री एपस्टीन मेलेला सापडतो. अशोक खरातचे असे काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की, त्याला कायमच्या कॅमेऱ्यांमध्ये ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण, अशोक खरातला मागच्या 20 वर्षांतील महाराष्ट्रातील राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. आदिवासी उगीच बदनाम, इथे चांगल्या घरांमध्ये जादूटोणा सुरू ते पुढे म्हणाले, कुणी काय केले, पुजा कुणी केली, पुजा कशी घातली गेली, कुणी रक्त दिले हे सगळे अशोक खरातला माहिती आहे. महाराष्ट्राला खरेच नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे न्यायचा असेल, हा जादू टोणा महाराष्ट्रात थांबवायचा असेल, आपण उगीचच त्या आदिवासींना जादूटोणा करतात म्हणून दोष देतो, इथे चांगल्या चांगल्या घरांमध्ये जादूटोणा सुरू आहे. कारण, लोकांचा विश्वास काळ्या जादूवर बसायला लागला आहे. मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांचे काही सहकारीच त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते तिथे जाऊन पुजेसाठी जाऊन रांग लावून बसले होते. ज्या अर्थी मुख्यमंत्री या प्रकरणाच्या चौकशीत एवढे घुसलेत, त्या अर्थी त्यांना संशय आहे. त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. पण जे काही घडत आहेत ते महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे आव्हाड म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर