ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शिवरायांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल:सुधाकर इंगळे महाराजांनी‎व्यक्त केले विचार‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल होते असे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी येथे बोलताना मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर कोकण कडा मित्र मंडळ, महाड व रायगड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात त्यांचे किर्तन झाले. ते पुढे म्हणाले, राजमुद्रा ही संस्कृतमध्ये असावी हा निश्चय म्हणजे क्रांतिकारी निर्णय होता. या रायगडावर तीन राजांचे राज्याभिषेक झाले आहेत. हा किल्ला प्रमुख साक्षीदार आहे. रायगडाच्या राज सदरांवर स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा झाला. योग्य आणि प्रामाणिक न्याय ही स्वराज्याची ओळख होती. अशा राजसदरेवर कीर्तन करण्याचा योग आल्याचे त्यांनी नमूद केले. वारीनिमित्त निघणारा पालखी सोहळा हे सर्व फक्त शिवरायांच्या मुळेच होत आहे. अशा शिवरायांच्या जीवनातील सुवर्ण क्षण- ऐतिहासिक क्रांती म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे. त्यामुळे या दिवसाला हिंदू साम्राज्य दिन असे ओळखले जाऊ लागले आहे. या कार्यक्रमाचे रायगड प्रतिष्ठानचे प्रमुख शिवाजी भोसले, जोतिराम चांगभले, विठ्ठल मोलाणे यांनी नियोजन केले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर