ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

120 शेतकरी गटांची उल्लेखनीय कामगिरी:शेतकरी गटाचा सन्मान सोहळा; उत्पादनही वाढले, ठरले गौरवाचे मानकरी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


| अकोला १२० शेतकरी गटांनी शेतीत उल्लेखनीय कामगिरी केल्याने ते गौरवाचे मानकरी झाले आहेत. सन २०२२ पासून पाणी फाउंडेशन ज्ञान आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करत आहे. गेल्या ३ वर्षांत ही चळवळ ४६ तालुक्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘गटशेती प्रीमियर लीग (जीपीएलन)’ आयोजित करण्यात आली होती. यात ज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खर्च कमी करणे आणि नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यासाठी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी पुढील वर्षीच्या ‘संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप’ साठी नव्या जोमानं सज्ज होत आहेत. ‘गटशेती प्रीमियर लीग’च्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यात ४२ शेतकरी गटांना प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोर्णा शेतकरी गटाचे निमंत्रक रामेश्वर उंडाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्वल बोलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संदीप चौधरी, कृषी मंडळ अधिकारी अविनाश मेश्राम, युवा पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर शेषराव, तुषार वानखडे, उमेद अभियानाचे नीलेश गायकवाड, अश्विनी नवघरे, रूपाली गावंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संघपाल अरुण वाहूरवाघ यांनी केले. बार्शीटाकळी तालुक्यातील पाच शेतकरी गटातील निमंत्रकांनी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा प्रवासाची मांडणी केली. यात कान्हेरी सरप येथील मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक रेश्मा इंगळे, राजंदा येथील भारती महिला शेतकरी गटाच्या ज्योती महल्ले, चेलका येथील मोर्णा पुरुष शेतकरी गटाचे विजय उंडाळ, बळीराजा महिला गटाच्या दीपाली उंडाळ, घोटा येथील माऊली पुरुष गटाचे पवन तवाडे यांनी फार्मर कप स्पर्धेचा प्रवास सांगितला. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन : भरारी महिला शेतकरी गटाने सुद्धा गट प्रीमियर लींक स्पर्धेमध्ये कामगिरी करून उत्पादन वाढवले. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन त्यांनी झाले. त्यांनी एसओपीची कटाक्षाने अंमलबजावणी केल्याने त्यांनी सांगितले. शेतकरी गटांचा गौरव करण्यात आला. ४२ गटांना सन्मानपत्र विभागीय समन्वयक उज्वल बोलवार यांनी शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्यांना मार्गदर्शन केले. पुढील वर्षी संपूर्ण तालुक्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांची गट करून आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बार्शीटाकळी तालुक्यातील ४२ शेतकरी गटांना सन्मानपत्र देण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर